लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आमदी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. केजरीवाल यांच्यासह आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह उपस्थित होती. पवार आणि केजरीवाल यांच्यात बंद दरवाजाआड अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, ही भेट खासगी होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
आणखी वाचा-…तर मुख्यमंत्र्यांची गाडी अडविणार! काँग्रेसकडून १५ दिवसांची मुदत देत थेट इशारा
मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालायत सायंकाळी ही भेट झाली. पवार यांना भेटण्यासाठी सुनीता केजरीवाल आणि खासदार संजय सिंह दिल्लीवरून पुण्यात आले. या भेटीनंतर केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच शरद पवार यांनीही या भेटीबाबत कोणतेही भाष्य केले नाही.