scorecardresearch

Video : … अन् शरद पवार यांनी अचानक केला मेट्रोतून प्रवास

पिंपरीमधील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा शरद पवार यांनी आज मेट्रो प्रवास केला

पिंपरीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास आज केला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली होती. असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. 

पिंपरीतील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार यांनी सकाळी साडेनऊ च्या सुमारास फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला. दरम्यान, मेट्रोला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी कोणालाच दिली नव्हती. ऐनवेळी शरद पवार येणार आहेत अशी माहिती स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना देण्यात आली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रो विषयी सर्व माहिती घेतली असे वाघेरे यांनी सांगितलं आहे.

यावेळी, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विशाल वाकडकर, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar travels through metro msr 87 kjp