लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोणत्या क्लृप्त्या करतील आणि कुठल्या थराला जातील, याचा काही नेम नाही. आपला हेतू साध्य करण्यासाठी मोठमोठे गुन्हे घडले असताना पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतापराव खंडेबऱ्हाड नावाच्या एका व्यक्तीला पैशांची मागणी करणारा फोन आला. समोरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच आवाज येत होता. फोन नंबर देखील शरद पवार यांच्या मुंबईतील घरचाच होता. त्यामुळे भांबावून गेलेल्या प्रतापराव खंडेबऱ्हाड यांची पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा घटनेचा मागोवा घेतला, तेव्हा कुठे खरा प्रकार समोर आला.

त्याचं झालं असं की…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील फिर्यादी प्रतापराव खंडेबऱ्हाड यांनी धीरज पठारे नामक आरोपीकडून एक कोटी रुपयांची रक्कम उधार घेतली होती. मात्र, या रकमेवर धीरच पठारेनं चक्रवाढ पद्धतीनं महिन्याला तब्बल १० टक्के व्याज लावलं होतं. त्यामुळे ही रक्कम वाढत वाढत एक कोटींवरून पाच कोटी झाली. धीरज पठारेनं प्रतापराव यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

दरम्यान, एवढ्या पैशांची सोय होऊ न शकल्यामुळे अखेर प्रतापराव खंडेबऱ्हाड यांनी आपल्या मालकीची चाकणमधील १३ एकर जमीन धीरज पठारेच्या नावावर करून दिली. त्यामुळे व्यवहार संपल्याचं देखील बोलणं झालं. मात्र, आपण घेतलेली जमीन पुन्हा विकलीच जात नसल्याचं सांगत धीरज पठारेनं प्रतापराव खंडेबऱ्हाड यांच्याकडे पुन्हा पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पठारेविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.

यानंतर देखील धीरज पठारे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने पैशांसाठी तगादा सुरूच ठेवला. पण देण्यासाठी पैसेच नसल्यामुळे प्रतापराव यांचा नाईलाज झाला. शेवटी पैसे मिळत नाही हे पाहून धीरज पठारेनं एक शक्कल लढवली!

थेट सिल्व्हर ओकच्या नंबरवरून फोन!

धीरज पठारेनं गुरव नावाच्या एका माणसाशी संधान साधलं. गुरवनं त्याच्यासोबत किरण काकडे नावाच्या व्यक्तीला घेतलं आणि एक मोठा कट रचला. गुरवनं एका कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजा प्रतापराव खंडेबऱ्हाड यांना फोन केला. शिवाय, या सॉफ्टवेअरमधून हा फोन थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवरून आल्याचं त्यानं भासवलं. त्यामुळे खंडेबऱ्हाड बुचकळ्यात पडले. गुरवनं किरण काकडे याला देखील जणू काही शरद पवार यांचा सहाय्यक म्हणून या फोन प्लॅनमध्ये सामील करून घेतलं होतं. दरम्यान, घाबरलेल्या खंडेबऱ्हाड यांनी पुन्हा पोलिसात धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी तपास करून या सगळ्या प्रकाराचा छडा लावला. या प्रकारामध्ये सहभागी असलेला गुरव, काकडे आणि स्वत: धीरज पठारे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

मंत्रालयातही गेला शरद पवारांच्या आाजात फोन!

दरम्यान, असाच एक प्रकार मुंबईत मंत्रालयात देखील घडल्याचं उघड झालं आहे. एका व्यक्तीने शरद पवारांच्या नावाने फोन करून थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी फोन केला. हा फोन देखील शरद पवारांच्या आवाजातच करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

 

या प्रकरणावरून राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात फोन करणं हे अत्यंत निंदनीय आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार राज्याच्या हितासाठी योग्य नसून असे काही घडल्यास राज्य सरकारला भविष्यात अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागेल”, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.