पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये (वय ७१) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही त्यांची ख्याती होती. लिमये यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिमये यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील डोंगराळ भागात रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण कसे करता येईल, तसेच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसे असावे, याबाबतही आराखडे त्यांनी तयार केले होते.

लिमये यांचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, फग्र्युसन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते सुवर्ण पदकविजेते विद्यार्थी होते. त्यानंतर मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय रेल्वेत दाखल झाले. रेल्वेत विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडल्यानंतर विभागीय व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashikant limaye consultant pune metro project passed away insistent role presenters ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST