पिंपरी : रस्ते, रेल्वे प्रकल्पांसाठी ५० हजार कोटींचा निधी आणून हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. प्रकल्पपूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचे, या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले. लोकसभेची आपली शेवटची निवडणूक असल्याचे आढळराव-पाटील यांनी जाहीर केले. त्यावरून आढळराव भावनिक प्रचार करत असल्याची टीका शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. त्यावर निधीतून प्रकल्प पूर्णत्वासाठी शेवटची निवडणूक असल्याचे मी म्हटले. माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकता हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हे यांनी काढल्याचे प्रत्युत्तर आढळराव यांनी दिले.

हेही वाचा : मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत; वंचितकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirur lok sabha ncp candidate shivajirao adhalarao patil told this is last election for him pune print news ggy 03 css
First published on: 21-04-2024 at 13:13 IST