scorecardresearch

लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा नारा

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.

लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा नारा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात लंडनच्या संसद चौकात साजरी करण्यात आली.

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात लंडनच्या संसद चौकात साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि देशातील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी केली. या वेळी जय शिवरायच्या अशा घोषणांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.       

हेही वाचा >>> पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ‘शिवसृष्टी’तील सरकारवाड्याची पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्ध कला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्यांमुळे शिवाजी महाराज आदर्श राजे ठरले. लंडन शहरात आपली भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यातील विद्यार्थी यावेळी अँड.संग्राम शेवाळे यांच्या पुढाकाराखाली शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी एकत्रित आले होते.  शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अभ्यासक भारतात येतात आणि हीच महाराष्ट्राची परंपरा आम्ही जोपासत शिवाजी महाराज यांना लंडन संसद चौकात वंदन केले, अशी माहिती अँड. संग्राम शेवाळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 17:22 IST

संबंधित बातम्या