सध्या राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीस पुण्याचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख हे गैरहजर होते. ते या बैठकीस का गेले नाहीत, यामागचे कारण देखील त्यांनी स्वत: सांगितले आहे.

“मी त्या बैठकीला जाऊ शकलो नाही. कारण हडपसर येथे दोन्ही पालखी येणार असल्याने मुंबईला जाणे शक्य झाले नाही. याबाबत पक्षातील वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक कुणीही कुठे जाणार नाही. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे, त्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आम्ही सर्वजण आहोत.” असं विजय देशमुख यांनी सांगितलं आहे.

Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Shashikant Shinde, dhule lok sabha,
माझ्यासमोर उमेदवार कोण हेच माहित नाही – शशिकांत शिंदे
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
cm eknath shinde hatkanangale lok sabha marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास

तसेच, “पदाधिकारी कुठेही गेले नाहीत, पण लोकप्रतिनिधीच काही सांगू शकत नाही लोकप्रतिनिधी सत्तेसाठी कुठेही जाऊ शकतात, मूळ शिवसैनिक ठाकरेंकडे निश्चित येतील, असा मला विश्वास आहे. मी आणि जिल्ह्यातील शिवसैनिक कुठे ही जाणार नाही. दुसरी कुठलीही शिवसेना होऊ शकत नाही. ठाकरेंची शिवसेना राहील, जे (एकनाथ शिंदे) त्यांच्याकडे जातील, त्या सर्वांकडे शिवसेनेच्या भाषेत पाहू.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.