scorecardresearch

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक

गॅस तसेच पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

पुणे : गॅस तसेच पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. नवी पेठ येथील पेट्रोल पंपापासून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत घरगुती गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.  शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहर संघटिका पल्लवी जावळे, संगीता ठोसर,  बाळा ओसवाल, प्रशांत राणे, तानाजी लोणकर,भरत कुंभारकर,राजेंद्र शिंदे,राजेंद्र बाबर यांच्यासह अन्य पदाधिकार उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले,की केंद्र सरकार गरिबांचे कैवारी नसून गरिबांची फसवणूक करणारे सरकार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस शेगडी देऊन चूल विझवली आणि अश्रू पुसले म्हणणाऱ्या सरकारने दरवाढ करून सामान्य नागरिकांच्या डोळय़ात अश्रू आणले आहेत.  पाच राज्याची निवडणूक विचारात घेऊन  इंधन दरवाढ  निवडणुकीपर्यंत  थांबवण्यात आली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच  इंधन दरवाढ करण्यात आली.  भाजप सरकारचा कारभार म्हणजे जनतेची वेळोवेळी करण्यात येणारी फसवणूक आहे, असे गजानन थरकुडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena aggressive petrol price hike petrol inflation prohibition movement shiv sena ysh

ताज्या बातम्या