सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपानं १ जून ही नवीन तारीख दिली आहे. राज्यात एकंदरीत राजकीय स्थिती तापत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत मोठं राजकीय विधान केलं आहे.

शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते खेडमधील आंबेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थित त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Bhiwandi Lok Sabha Constituency, election 2024, Maha Vikas Aghadi, mahayuti, Suresh mhatre alias Balya Mama
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका
Ranjitsinh Mohite patil, Madha Lok Sabha,
माढ्यात आमदार रणजितसिंह मोहिते भाजपकडून अघोषित बहिष्कृत
Raju Shettys candidature filed by going in bullock cart show of strength by swabhimani shetkari sanghatana
बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन
Lok Sabha election 2024 Heavy marching in North Nagpur Predominance of Congress and BJP is also ready
रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!

राऊत यांनी पुढे म्हटलं की, शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी आढळराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आढळरावांनी शिरूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी भविष्यात आढळराव हे संसदेत असतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, असंही राऊत यावेळी म्हणाले.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, यंद्याच्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव करत शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली होती. २३ उमेदवार उभे असणाऱ्या या मतदारसंघातील जवळजवळ ५० टक्के म्हणजेच ६ लाख ३२ हजार ४४२ मते कोल्हे यांना मिळाली होती. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली होती. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी आढळराव यांचा पराभव केला होता.