बंडखोर आमदार पंगतीतले कावळे,बंडखोर आमदार डोम कावळा’ असे फलक शववाहिकेवर लावले
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. त्याच दरम्यान टिंबर मार्केट ते रामोशी गेट पर्यन्त पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शववाहिकेमधून काढण्यात आली. या शववाहिकेवर ‘बंडखोर आमदार पंगतीतले कावळे,बंडखोर आमदार डोम कावळा’ हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.तर यावेळी एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार तानाजी सावंत यांच पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे ऑफिसची तोडफोड झाल्याची घटना घडली.

तर त्याच दरम्यान सदाशिव पेठेतील वैद्यकीय मदत कक्षावरील एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे,मंगेश चिवटे यांच्या फोटोला शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज सकाळी कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास टिंबर मार्केट शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले. त्या कार्यक्रमानंतर टिंबर मार्केट ते रामोशी गेट दरम्यान एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होत,एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena symbolic funeral procession mla eknath shinde timber market ramoshi gate pune amy
First published on: 26-06-2022 at 19:30 IST