scorecardresearch

पुणे : ब्रेक निकामी झाल्याने शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर अपघात, चालकाच्या प्रसंगावधाने जीवीतहानी नाही

प्रसंगावधान राखत चालकाने रस्त्याच्या कडेला बस घेतली आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतांना ती बस झाडावर जाऊन धडकली.

Shivshahi, ST bus, Pune, bus accident, Sangamwadi bridge
पुणे : ब्रेक निकामी झाल्याने शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर अपघात, चालकाच्या प्रसंगावधाने जीवीतहानी नाही

पुणे : पिंपरी चिंचवडवरून भुसावळच्या दिशेने जाणार्‍या शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. तेव्हा ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात बसच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

हेही वाचा… पिंपरी: मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगून एकाने केली शैक्षणिक संस्थाचालकांची, पालकांची  फसवणूक

हेही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी चिंचवडवरून भुसावळच्या दिशेने MH 9 EM 2593 या क्रमांकाची बस आज सकाळच्या सुमारास २५ प्रवाशांना घेऊन जात होती. ती बस संगमवाडी पुलावर आल्यावर बसचा ब्रेक झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.त्यावर बस चालकाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.पण समोर खूप वाहन होती.त्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रसंगावधान राखत चालकाने रस्त्याच्या कडेला बस घेतली आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतांना ती बस झाडावर जाऊन धडकली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 13:20 IST

संबंधित बातम्या