धक्कादायक : तीन महिन्यांच्या मुलीचा आईनेच गळा दाबून केला खून

आपल्या १३ वर्षीय मुलाला मृतदेह नदीत फेकायला सांगितलं.

पुण्यातील येरवडा भागात राहणार्‍या एका आईने तिच्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पल्लवी असे आरोपी आईचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या १३ वर्षाच्या मुलास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आई पल्लवीचे एका मजुरासोबत अनैतिक संबध होते व त्यातून तिला दिवस गेले होते. त्यापूर्वीच ती पती पासून वेगळी राहत असल्याने, याबाबत गावामध्ये सर्वांना काही दिवसांनी माहिती होईल, या भीतीपोटी ती येरवडा येथे राहणार्‍या भावाकडे १३ वर्षांच्या मुलासह राहण्यास आली होती.

दरम्यान तिला तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. त्यानंतर घरामध्ये सर्व ठिकठाक सुरू असताना. दिवाळीनंतर गावी जावे लागणार असल्याने, गावामध्ये बाळाबद्दल सर्वांना माहिती होणार, आता काय करायचे? असा विचार आरोपी आईच्या डोक्यात सतत येत होता. यातूनच तिनेन शुक्रवारी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून तिला एका पिशवी मध्ये ठेवले आणि तिच्या १३ वर्षांच्या मुलास घरापासून काही अंतरावर असलेल्या नदी पात्रात टाकण्यास सांगितले. त्या अल्पवयीन मुलाने देखील आईने सांगितल्याप्रमाणे केले. त्यानंतर काही वेळाने आरोपी आई मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यास पोलिसांकडे गेली. पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर तपास सुरू केला. मात्र आई आणि मुलांवर संशय आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी या गुन्हाची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तिथे पिशवीच्यावर दगड होते आणि त्याखाली तीन महिन्याची मुलगी मृत अवस्थेत होती. त्यानंतर ससून येथे शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती येरवडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक रवींद्र कुमार वारंगुळे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shocking three month old girl murdered by her mother msr 87 svk

ताज्या बातम्या