Short response to B Ed admissions in college in State | Loksatta

राज्यात बी.एड. प्रवेशांना अल्प प्रतिसाद; पहिल्या फेरीत सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

बी.एड. प्रवेशासाठी एकूण ३५ हजार ३५९ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत ५७ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

राज्यात बी.एड. प्रवेशांना अल्प प्रतिसाद; पहिल्या फेरीत सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
(संग्रहित छायाचित्र)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबवण्यात येणाऱ्या शिक्षणशास्त्र (बी.एड.) प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीत सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी येत्या १२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा- पुणे: सांगवीतील रोजगार मेळाव्यात ११०० जणांना जागेवर नियुक्तीपत्रे

सीईटी सेलकडून राज्यात बीएड प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ४८० महाविद्यालयांचा सहभाग आहे. प्रवेशासाठी एकूण ३५ हजार ३५९ जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत ५७ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पर्याय भरलेल्या ३० हजार १६७ विद्यार्थ्यांपैकी सात हजार ७२७ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येते. प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीची निवड यादी १२ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. या फेरीनंतर संस्थास्तरावर प्रवेश फेरी राबविण्यात येणार असल्याने, डिसेंबर अखेरपर्यत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 21:50 IST
Next Story
पुणे : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीची आत्महत्या; खडकवासला भागातील घटना