पुणे : पेट्रोलियम कंपन्यांकडून मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले. पंपचालकांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोवर इंधन भरण्यासाठी त्यांचे टँकर पाठविणे बंद केले आहे. यामुळे पंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला असून, इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेने पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ९०० पंपचालक तसेच सातारा जिल्ह्यातील ५०० पंपचालक सहभागी झाले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोवरून इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये ८५ टक्के पंपचालकांचे तर १५ टक्के खासगी वाहतूकदारांचे आहेत. या बंदमुळे पंपचालकांनी इंधन वाहतुकीसाठी टँकर पाठविणे बंद केले आहे. यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून, शहरात रात्री अनेक पंपांवरील इंधन साठा संपला. उद्या पुरवठा सुरळीत न झाल्यास इतर पंपांवरील इंधन साठा संपून शहरात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Passengers disturbed due to misbehavior of men near the parcel section entrance of Pune railway station Pune news
रेल्वेच्या परिसरात पुरुषांचे लज्जास्पद वर्तन…महापालिकेकडे कोणी केली तक्रार?
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
Asangaon-Kasara local trips, local trains running late,
आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा, लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी
Nashik rural police seized 136 cylinders vehicles and equipment worth rupess 11 15 lakh in Devala
अवैध गॅस अड्ड्यावर छापा ११ लाखाचा मुद्देमाल जप्त
1 December Petrol & Diesel Price
Daily Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईत वाढला पेट्रोल-डिझेलचा भाव? एक लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार

हेही वाचा >>>पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात. सर्व भागधारकांना विचारात न घेता पेट्रोलियम कंपन्या पावले उचलत आहेत. यामुळे इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात असून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांना आंदोलनाची सूचना दिली होती. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची आहे.

इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे गेल्या दोन वर्षांत इंधन चोरीच्या १० घटनांची नोंद झाली आहे. अशाच इंधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केली. पेट्रोलियम कंपन्यांकडून चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाल्याने या चोऱ्या होत आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शहरासाठी १ हजार नव्या ई-बसचा प्रस्ताव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाठपुरावा

पेट्रोल पंपचालकांच्या मागण्या

– इंधन वाहतुकीच्या सर्व निविदा त्वरित रद्द कराव्यात.

– सुरक्षित वाहतुकीसाठी व्यवहार्य दरांसह नवीन निविदा काढाव्यात.

– सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे.

– इंधन चोरीतील या अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही पोलीस चौकशी व्हावी.

पेट्रोलियम कंपन्यांसोबत सोमवारी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर मंगळवारी या कंपन्यांकडून चर्चेचे पाऊल उचलण्यात आले नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. इंधन टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास पेट्रोलियम कंपन्या जबाबदार असतील.ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे

Story img Loader