मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली असताना खासदार गिरीश बापट यांनी यासंदर्भात मौन बाळगले आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्यासंदर्भात रस्त्यांची दुरवस्था वगळून खासदार गिरीश बापट यांनी अन्य विषयासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा केली.

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची खासदार गिरीश बापट यांनी काही प्रश्नांसंदर्भात महापालिकेत भेट घेतली. शहरातील मेट्रो प्रकल्प, नदी सुधार योजना, घोरपडी रेल्वे पूल यांच्यासह अन्य विषयासंदर्भात बापट यांनी आयुक्तांबरोबर चर्चा केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना बापट यांनी आयुक्तांना केली.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा

दर दोन महिन्यांनी आयुक्तांबरोबर चर्चा –

“शहरातील खड्ड्यांवर चर्चा झालीच पाहिजे. मात्र सध्या अन्य काही महत्त्वाचे विषय असल्याने त्यावर चर्चा झाली नाही. येत्या काही दिवसांत त्याबाबत प्रशासनाबरोबर बैठक घेण्यात येईल आणि आवश्यक त्या सूचना केल्या जातील. विमानतळ रस्त्याचा प्रश्नही लवकर सुटणार आहे. दर दोन महिन्यांनी आयुक्तांबरोबर चर्चा केली जाते.”, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

… म्हणून खड्डे दुरुस्तीच्या विषयावर चर्चा झाली नाही – बापट

“संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रलंबित प्रश्नासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आली. खडकी येथील मेट्रोचे काम काही कारणांनी थांबले आहे. काही जागा अद्यापही ताब्यात आलेल्या नाहीत. त्याबाबत प्रशासनाला सूचना केली. त्याचबरोबर अमृत योजना, नदी सुधार योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तातडीचे प्रलंबित आणि महत्त्वाचे विषय असल्याने खड्डे दुरुस्तीच्या विषयावर चर्चा झाली नाही.” असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

शरद पवारांवर टीका –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर खासदार गिरीश बापट यांनी टीका केली. देशात केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही सुरू आहे, असे विधान पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या सांगण्यावरून दिल्लीत राजकारण चालत नाही, असे बापट म्हणाले.