Premium

सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय

सिंहगड रस्त्यावर पिंपरीतील उपाहारगृहचालकाचा टोळक्याने कोयत्याने वार करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. वैमनस्यातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

murder crime
(फोटो सौजन्य : पीक्साबे)

पुणे : सिंहगड रस्त्यावर पिंपरीतील उपाहारगृहचालकाचा टोळक्याने कोयत्याने वार करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. वैमनस्यातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विजय वसंतराव ढुमे (वय ४४, रा. चिंचवड ) असे खून झालेल्यांचे नाव आहे. विजय हे शहर पोलीस दलातील निवृत्त पोलीस वसंतराव ढुमे यांचा मुलगा होता. सिंहगड रस्त्यावरील गीतांजली अपार्टमेंटजवळ असलेल्या क्वालिटी लॉजमधून विजय शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास बाहेर पडले. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्लालिटी लाॅज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. खुनामागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा खून वैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sinhagad road restaurant manager murder suspicion of murder enmity pune print news rbk 25 ysh

First published on: 30-09-2023 at 00:01 IST
Next Story
विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा