पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीची बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या सहा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटना स्थळावरून पोलिसांनी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. तर या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निशिकांत खेत्रमोहन पात्रा, मानस बाबुली पात्रा, गौतम निरंजन मिडधा,नारायण लालजी मेरा,लिनेश हिराचंद गाला आणि प्रवित्र जगबंधू पात्रा या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील येथील एका गोडाऊनमध्ये नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधन तयार केली जात आहेत. याबाबतची माहिती पोलिस हवालदार राजेश दराडे यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेऊन, तेथील नारायण लालजी मेरा यांच्याकडे संबधित सौंदर्य प्रसाधना बाबत परवाना आहे का ? अशी विचारणा केल्यावर नाही असे उत्तर दिले.त्यावेळी तेथील गोडाऊनमध्ये अनेक नामांकित कंपनीचे बनावट प्रॉडक्ट आढळून आले.त्या ठिकाणी ३७ लाखाहून अधिकचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. तसेच निशिकांत खेत्रमोहन पात्रा, मानस बाबुली पात्रा, गौतम निरंजन मिडधा, नारायण लालजी मेरा,लिनेश हिराचंद गाला आणि प्रवित्र जगबंधू पात्रा या सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पी.चौगुले करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six people were arrested for making fake cosmetics of a reputed company svk 88 msr
First published on: 30-06-2022 at 12:58 IST