scorecardresearch

सिंहगड किल्ल्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्राची चोरी करणारे सहा चोरटे गजाआड

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी घेतला शोध

सिंहगड किल्ल्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्राची चोरी करणारे सहा चोरटे गजाआड
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

पुणे : सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागविण्यात आलेल्या साडेसात लाख रुपयांच्या यंत्राची चोरी करणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. सिंहगडावर काम करणाऱ्या एका कामगाराने साथीदारांशी संगनमत करुन यंत्र चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सुनील शिवाजी चव्हाण (वय २३), आकाश काळूराम चव्हाण (वय २५, दोघे रा. मोरदरी, ता. हवेली, जि. पुणे), दादा बबन चव्हाण (वय ३६ ,रा. शिंदेवाडी, ता. हवेली, जि. पुणे), शुभम रोहिदास भंडलकर (वय २३), शंभू दत्तात्रय शितकल (वय २२, दोघे रा. माहूर, ता. पुरंदर, जि. पुणे) तसेच भंगार माल खरेदी करणारा व्यावसायिक सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय ३०, रा. गुजरवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा >>> पुण्यात हुक्का पार्लरवर छापे, कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्त्यावर कारवाई

  सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच प्रक्रिया करण्यासाठी यंत्र मागविण्यात आले आहे. साडेसात लाख रुपये किंमतीचे यंत्र चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते.

सिंहगडावर जाणाऱ्या खेडशिवापूर आणि डोणजे गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांना चित्रीकरणात टेम्पाे आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन चव्हाण, भंडलकर, शितकल आणि साह यांना अटक केली.

हेही वाचा >>> पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

  पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, निरंजन रणवरे, अजित भुजबळ, राजू मोमीन, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, गणेश धनवे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या