सिंबायोसिस आणि ‘ग्रॅव्हिटस’चा उपक्रम 

पुणे : तृतीयपंथीयांसाठी कौशल्यविकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याकरता सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम आखण्यात आले असून अशा प्रकारचा देशातील हा पहिला उपक्रम ठरण्याची शक्यता आहे.

ग्रॅव्हिटस कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक उषा काकडे, सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफे शनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार आणि तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकत्र्या लक्ष्मी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

उषा काकडे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथीही याला अपवाद नाहीत. त्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन सन्मानाने जगण्यासाठी उपयुक्त ठरतील असे सौंदर्य प्रसाधन सेवा, शिवणकाम, हर्बल उत्पादने, सॅनिटरी पॅड उत्पादने निर्माण करणे यासारखे अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत.