पुण्याच्या चाकण मध्ये चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला. घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना चाकणच्या कडाचीवाडी येथील घडली आहे. सुदैवाने वेळीच तेथील नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले अन्यथा चिमुकल्याचा जीव कुत्र्यांनी घेतला असता.
पुण्याच्या चाकण मध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार ते पाच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चिमुकला रस्त्यावरून जात असताना त्याला एक कुत्रा दिसतो. तो त्याला हुसकावतो. हे बघून दुसरी कुत्री चिमुकलेच्या अंगावर धावून थेट हल्ला केला. कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके घेतल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे. काही क्षणात कुत्र्यांचा आवाज येकून एक महिला धावत घराबाहेर येते आणि त्या कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करते. महिलेला बघून इतर नागरिक येऊन कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या चिमुकल्याला सोडवतात. हा सर्व थरार सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न येरणीवर वर आला आहे. पालकांनी देखील आपल्या मुलाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं.