scorecardresearch

पुण्यात सेक्स तंत्र कार्यशाळेची समाजमाध्यमांद्वारे जाहिरात; सायबर पोलिसांकडून तपास

पुण्यात कला-कौशल्याच्या कार्यशाळा नेहमीच होत असतात. मात्र खास नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यात चक्क ‘सेक्स तंत्र’ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे समाजमाध्यमांत फिरत असलेल्या जाहिरातीमुळे निदर्शनास आले.

पुण्यात सेक्स तंत्र कार्यशाळेची समाजमाध्यमांद्वारे जाहिरात; सायबर पोलिसांकडून तपास
संग्रहीत छायाचित्र

पुणे – पुण्यात कला-कौशल्याच्या कार्यशाळा नेहमीच होत असतात. मात्र खास नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यात चक्क ‘सेक्स तंत्र’ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे समाजमाध्यमांत फिरत असलेल्या जाहिरातीमुळे निदर्शनास आले. कार्यशाळेसाठी जाहिरातीवरील क्यूआर कोड, व्हॉट्सॲपद्वारे नोंदणी करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले असून, मात्र प्रकाराची दखल घेऊन या जाहिरातीसंदर्भात संदर्भात सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरणार; कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस सरी

हेही वाचा : पिंपरी : सांगवीत सराफाच्या पेढीत १७ लाखांची चोरी

एका फाऊंडेशनकडून १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या कार्यशाळेत वैदिक सेक्स तंत्र, डिव्हाईन फेमिनाईन, मस्क्युलाइन, एम्बॉडीमेंट, बायोएनर्जेटिक प्रॅक्टिसेस, चक्र ॲक्टिव्हेशन, ओशो मेटिडिटेशन शिकवण्यात येईल. कार्यशाळेसाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कातच भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात ही जाहिरात फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने सायबर पोलिसांकडून या जाहिरातीची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media promotion sex techniques workshop pune investigation cyber police pune print news ysh

ताज्या बातम्या