पुणे : माहिती- तंत्रज्ञान किंवा विज्ञान क्षेत्रातील घोडदौड असो, की उंचावलेल्या आर्थिक स्तरामुळे जीवनशैलीला लाभलेले आधुनिक परिमाण असो, आपल्या समाजात डावखुऱ्यांचे स्थान आजही डावेच आहे, हे वास्तव आहे. त्यामुळेच घरातील कोणी व्यक्ती, विशेषत: आपले मूल डावखुरे असेल तर त्याचे डावखुरेपण स्वीकारणे आजही आई-वडिलांना अवघड जाते. त्यातून त्याला उजखुरे करण्याचा अट्टहास घडतो. एवढेच कशाला, विवाहेच्छूंचे विवाह जमतानाही त्यांचे डावखुरे असणे आड येते, हे तुम्हाला माहितीये का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी (१३ ऑगस्ट) असोसिएशन ऑफ लेफ्ट-हँडर्सतर्फे ‘जागतिक डावखुरे दिन’ साजरा केला जात आहे. ‘डावे-उजवे असे काही नसते, हे सगळे आपल्या मनाचे गैरसमज आहेत. त्यामुळे डावखुऱ्या मुलांना बळजबरीने उजखुरे करू नका. दोन्ही हातांना सारखंच महत्त्व द्या,’ अशी जागृती करून यंदा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जागतिक डावखुरे दिनानिमित्त जगभरात ३० सप्टेंबपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष बिपिनचंद्र चौगुले यांनी दिली. चौगुले म्हणाले,की डावे म्हणजे दुय्यम किंवा गौण नाही. माणसाच्या उजव्या हाताप्रमाणे डावा हात देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जेवण, लेखन, पूजा, प्रसाद आणि खेळ यासाठी डावा हात वापरणे पूर्णपणे नैसर्गिक, सामान्य आणि आरोग्यदायी असते. त्यामुळे डाव्या हाताच्या वापराला मज्जाव करू नये, या विषयावर प्रबोधन करत राहण्याची आवश्यकता असल्याचे चौगुले स्पष्ट करतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social position left handers misunderstandings citizens awareness needed ysh
First published on: 13-08-2022 at 00:02 IST