Solapur ZP Election Results LIVE Updates (सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Solapur ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Solapur Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ६८ निवडणूक विभाग आणि ११ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १३६ पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ६८ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | ११ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | १३६ |
Solapur Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष २३ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १४ जागांसह भाजप पक्षाची कामगिरी राहिली.
सोलापूर जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर संजय शिंदे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी स्थानीय गठबंधनचे शिवानंद पाटिल यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| राष्ट्रवादी | २३ |
| भाजप | १४ |
| काँग्रेस | ७ |
| दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख | ५ |
| शिवसेना | ५ |
| परिचारक गट | ३ |
| महाडिक गट | ३ |
| समाधान आवताडे गट | ३ |
| शहाजीबापू पाटील | २ |
| संजय शिंदे | २ |
| सिद्रामप्पा पाटील गट | १ |
| एकूण | ६८ |
सोलापूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Solapur Zilla Parishad Ward Wise Results 2017)
सोलापूर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६८ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| १३ | किरण सुरेश मोरे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६५ | मल्लिकार्जुन महादेव पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| १ | राणी संतोष वेअर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २ | लक्ष्मी जनार्दन आवटे | शिवसेना (SHS) |
| ३ | सवितादेवी शहाजीराव राजेभोसले | शिवसेना (SHS) |
| ४ | नीलकंठ तुकाराम देशमुख | शिवसेना (SHS) |
| ५ | अनिरुद्ध विठ्ठल कांबळे | शिवसेना (SHS) |
| ६ | शुभांगी अप्पासाहेब उबाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७ | रणजितसिंह बबनराव शिंदे | स्वतंत्र |
| ८ | रोहिणी संभाजी मोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ९ | संजय विठ्ठलराव शिंदे | स्वतंत्र |
| १० | अंजनादेवी शिवाजी पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ११ | रोहिणी तुकाराम ढवळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १२ | भरत हरिभाऊ शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १४ | रेखा वैभव राऊत | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १५ | मदन अभिमन्यू दराडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| १६ | संगिता अरुण डोईफोडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| १७ | श्रीमंत सदाशिव थोरात | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १८ | रेखा प्रकाश भूमकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १९ | बळीराम भाऊराव साठे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २० | उषा ज्ञानोबा सुरवसे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| २१ | विजयराज मनोहर डोंगरे | स्वतंत्र |
| २२ | विक्रांत राजन पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २३ | उमेश सुरेश पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २४ | तानाजी शंकरराव खताळ | स्वतंत्र |
| २५ | शिवाजी श्रीपती सोनवणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २६ | शैला धनंजय गोडसे | भीम परिसार विकास आघाडी पक्ष |
| २७ | रजनी बाळासाहेब देशमुख | पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी |
| २८ | अतुल लाला खरात | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २९ | सुभाष बापूराव माने | पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी |
| ३१ | सविता निखिलगीर गोसावी | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३२ | शोभा तानाजी वाघमोडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३३ | रुक्मिणी रामदास ढोणे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३४ | वसंतराव दौलतराव देशमुख | पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी |
| ३५ | ऋतुजा शरद मोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३६ | साक्षी महेश सोरते | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३७ | संगीता संजय मोटे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३८ | मंगल किरण वाघमोडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३९ | शितलादेवी धैर्यशील मोहितेपाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४० | सुनंदा बाळासाहेब फुले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४१ | अरुण बबन तोडकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४२ | स्वरूपाराणी जयसिंह मोहितेपाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४३ | त्रिभुवन विनायक धैंजे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४४ | ज्योती केशवराव पाटील | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४५ | गणेश माधवराव पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४६ | गोविंद मारुती जरे | सांगोला शहर विकास महायुती |
| ४७ | अतुल प्रभाकर पवार | सांगोला शहर विकास महायुती |
| ४८ | स्वाती तुळशीराम कांबळे | स्वतंत्र |
| ४९ | संगीता संगम धांडोरे | स्वतंत्र |
| ५० | दादासाहेब मारुती बाबर | स्वतंत्र |
| ५१ | सचिन लक्ष्मण देशमुख | स्वतंत्र |
| ५२ | अनिल तानाजी मोटे | स्वतंत्र |
| ५३ | नितीन राजाराम नकाते | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५४ | शिला सचिन शिवशरण | जनहित विकास आघाडी मंगळवेढा |
| ५५ | मंजुळा भरत कोळेकर | जनहित विकास आघाडी मंगळवेढा |
| ५६ | दिलीप अप्पासो चव्हाण | जनहित विकास आघाडी मंगळवेढा |
| ५७ | रेखाबाई राजेंद्र गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५८ | अन्नराव भुतालसिद्ध बरचरे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ५९ | संजय गुलचंद गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ६० | अमर रतिकांत पाटील | शिवसेना (SHS) |
| ६१ | विधुलता प्रभाकर कोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६२ | प्रभावती अमोगसिद्ध पाटील | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६३ | मंगल मल्लिनाथ कल्याणशेट्टी | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६४ | आनंद रामलिंग तानावडे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ६६ | शिवानंद सिद्रामप्पा पाटील | स्वतंत्र |
| ६७ | शिलावंती गुरुबसप्पा भोसगी | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ६८ | स्वाती शशिकांत शटगर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
सोलापूर जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Solapur ZP Ward Wise Election Results 2026)
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ६८ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमध्ये एकूण १३६ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४,३१७,७५६ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | करमाळा पंचायत समिती |
| २ | माढा पंचायत समिती |
| ३ | बार्शी पंचायत समिती |
| ४ | उत्तर सोलापूर पंचायत समिती |
| ५ | मोहोळ पंचायत समिती |
| ६ | पंढरपूर पंचायत समिती |
| ७ | मंगळवेढा पंचायत समिती |
| ८ | सांगोला पंचायत समिती |
| ९ | माळशिरस पंचायत समिती |
| १० | दक्षिण सोलापूर पंचायत समिती |
| ११ | अक्कलकोट पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. सोलापूर जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. सोलापूर जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण ६८ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात ११ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १३६ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.

