“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”; फिल्मसिटीवरुन अजित पवारांचा इशारा

मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar warning from Filmcity yogi adityanath

राज्यात आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली नाटकाची तिसरी घंटा आता वाजणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली. अजित पवारांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान फिल्मसिटी उत्तर प्रदेश येथे हलवण्यावरून अजित पवारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे.

मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य हे सरकार करेल आणि सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

“कोल्हापूरच्या चित्रपटनगरीमध्ये सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. मुंबईच्या फिल्मसिटीमध्येही अधिकच्या सुविधा देता येतील. कारण काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण इथेच इतक्या चांगल्या सुविधा देऊ. जेव्हा पासून चित्रपटसृष्टी सुरु झालेली आहे तेव्हापासून संपूर्ण देशाचे केंद्र मुंबई आहे. ते मुंबईच राहावं ते महाराष्ट्रातच राहावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे. त्याकरता महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल आणि मराठी चित्रपटनगरीकरता सूचना असतील त्या सांगा,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

कठोर निर्बंधामुळे गेले सात महिने नाटकावर पडलेला पडदा आज दूर होणार आहे. राज्य शासनाने २२ ऑक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देताच नाट्यसृष्टीतील हालचालींना वेग आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रंग मंदिराची तिसरी घंटा वाजली.

“सध्या ५० टक्के उपस्थितीची व्यवस्था आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे. कॉलेज, शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या नंतर अंदाज आम्ही बघत आहोत. सध्या सगळीकडे करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे परिस्थिती सुधारत आहे. त्याला धक्का लागून आपल्याकडून चुका होऊन तिसरी लाट येऊ नये ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. आम्हाला सरकार चालवताना हे बंद करा ते बंद करा असे अजिबात आवडत नाही. सगळ्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Some cm had come to take bollywood out but ajit pawar warning from filmcity yogi adityanath abn 97 svk