पुणे: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'पीएमपी'च्या खास फेऱ्या | Special rounds of PMP for the convenience of students pune print news apk 13 amy 95 | Loksatta

पुणे: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’च्या खास फेऱ्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून खास विद्यार्थी सेवा सुरू केली आहे.

पुणे: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’च्या खास फेऱ्या
(संग्रहित छायाचित्र)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून खास विद्यार्थी सेवा सुरू केली आहे. या दोन्ही शहरातील आठ मार्गांवर सायंकाळी गर्दीच्या वेळी पीएमपी कडून ही सेवा दिली जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्ट्या वगळून ही खास विद्यार्थी फेरी सुरू राहील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज

वसंत चित्रपटगृह ते धायरी मारूती मंदिर (स्वारगेट मार्गे), डेक्कन काॅर्नर ते एनडीए १० नंबर गेट, डेक्कन काॅर्नर ते कोथरूड डेपो, डेक्कन ते धनकवडी (टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे), वसंत चित्रपटगृह ते कात्रज (स्वारगेट मार्गे), वसंत चित्रपटगृह ते अप्पर डेपो (स्वारगेट मार्गे), पुणे रेल्वे स्थानक ते कोंढवा खुर्द , चाफेकर चौक (चिंचवड) ते वाल्हेकरवाडी या मार्गांवरही सेवा सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे: सदस्यपदासाठी ३०३३,तर सरपंचपदासाठी ५६० उमेदवार; जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाड्यांना सायंकाळी गर्दीच्या वेळी खास विद्यार्थी फेऱ्या असे संबोधित करण्यात येणार असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 20:32 IST
Next Story
पुणे : वत्सलाबाई जोशी पुरस्कार पं. उपेंद्र भट यांना जाहीर