पारपत्र मिळवणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केली जाते. पोलिसांकडून केली जाणारी पडताळणी पारपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून गेल्या दहा महिन्यांत एक लाख नागरिकांची पारपत्र पडताळणी केली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे पारपत्र प्रक्रिया सुलभ झाली असून करोना संसर्गानंतर नोकरी, व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

हेही वाचा >>>पुणे: निकृष्ट दर्जामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील भोजनगृहात आंदोलन

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत पारपत्र पडताळणी विभाग आहे. पारपत्र कार्यालयात पडताळणी केल्यानंतर संबंधित प्रकरण (फाइल) पोलिसांकडे पाठविण्यात येते. त्यानंतर पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केली जाते. पारपत्र मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेत चारित्र्य पडताळणी महत्त्वाचा भाग मानला जातो. पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही, याबाबतची पडताळणी केली जाते. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या पडताळणीसाठी २१ दिवसांची मुदत आहे. मात्र, पोलिसांकडून केली जाणारी चारित्र्य पडताळणी त्वरित केली जात असल्याने नागरिकांना २१ दिवसांच्या आत घरपोहोच पारपत्र मिळते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पारपत्र पडताळणी प्रकरणांना त्वरित निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस ठाण्यांच्या पातळीवर दररोज ३०० ते ५०० पारपत्रांची पडताळणी केली जात आहे. गेल्या दहा महिन्यांत एक लाख नागरिकांची पारपत्र पडताळणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून केली जाणारी चारित्र्य पडताळणी त्वरित होत असल्याने पारपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय नारवाड, उपनिरीक्षक नीताराणी हवालदार- डेरे, ज्योती शेंडकर काम पाहत आहेत.

हेही वाचा >>>पुणे:अद्याप निम्मेच कारखाने सुरू; उसाच्या गळीत हंगामाला गती येईना

पारपत्र मिळवण्याची प्रक्रिया
अर्जदारास पासपोर्ट सेवा संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. पारपत्र कार्यालयाकडून प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करण्यास अर्जदारास बोलाविले जाते. त्यानंतर संबंधित प्रकरण पोलिसांकडे पाठविले जाते. पोलीस आयुक्तालयातील पडताळणी विभागाकडून चारित्र्य पडताळणी केली जाते. अर्जदार वास्तव्यास असलेल्या परिसरातील पोलीस ठाण्याकडून अर्जदाराची पडताळणी करतात. अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत का नाही, याची खातरजमा केली जाते. पारपत्र कार्यालयाकडून प्रकरण पोलिसांकडे आल्यास २१ दिवसांच्या आत पडताळणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पारपत्र चारित्र्य पडताळणी त्वरित करण्यात येत आहे. त्यामुळे २१ दिवसांच्या आत नागरिकांना घरपाेहोच पारपत्र उपलब्ध होत आहे.

हेही वाचा >>>पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई विशेष रेल्वेला मुदतवाढ; प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वेचा निर्णय

पाच वर्षांत पाच लाख ३० हजार नागरिकांची पडताळणी
पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागाकडून गेल्या पाच वर्षांत पाच लाख ३० हजार नागरिकांची पारपत्र पडताळणी केली आहे. दररोज ३०० ते ५०० प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. करोना संसर्गानंतर परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या दुपटीने वाढली आहे.

पारपत्र पडताळणी वर्ष पडताळणी
२०१८ १ लाख ४३ हजार ७०
२०१९ १ लाख ३३ हजार ९०६
२०२० ६६ हजार ४३०
२०२१ ९७ हजार २६२
२०२२ १ लाख १ हजार ९०८
( २०२२ ची आकडेवारी ऑक्टोबर अखेरीपर्यंतची)

हेही वाचा >>>पुणे:‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी १०० गाड्या, संचालक मंडळासमोर लवकरच प्रस्ताव

पारपत्र प्रक्रियेतील चारित्र्य पडताळणी प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्याच्या (झिरो पेंडन्सी) सूचना देण्यात आल्या आहेत. अर्जदारास २१ दिवसांच्या आत पारपत्र मिळत आहे. पारपत्र पडताळणी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पारपत्र प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले आहे.- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त