शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेअंतर्गत विविध कामांनी वेग घेतला असून भुयारी मार्गात रूळ टाकण्याचे तसेच विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मेट्रो सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या या कामांनी गती घेतल्याने येत्या काही दिवसांत भुयारी मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. ही मार्गिका शिवाजीनगर स्थानकापर्यंत उन्नत असून तेथून स्वारगेट पर्यंतची मार्गिका भुयारी आहे. एकूण सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाता शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी पाच स्थानके आहेत. भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा-सहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता रूळ टाकणे, विद्युत तारा बसविणे, सिग्नल यंत्रणा उभारणे अशी कामे सुरू झाली आहेत.

हेही वाचा : पुणे : मिरची, फ्लॅावर, गवार महागली ; ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात घट

रूळ टाकण्यासाठी बोगद्याच्या खालील भागात काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. दोन रूळामधील रुंदीनुसार काँक्रिटचे जोते (प्लिंथ) तयार करण्यात येत आहे. त्यावर अन्य तांत्रिक कामे करण्यात येणार असून ५७ मीटर लांबीच्या रुळाचें तुकडे बोगद्यात पोहोचविण्यात आले आहेत. शिवाजीनगर सत्र न्यायालय, रेंजहिल्स या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी या कामांना सुरूवात करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे : समाविष्ट गावांतील कचरा संकलनासाठी नवा प्रकल्प

रूळ टाकण्याबरोबरच विद्युत तारा बसविणे, सिग्लन यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रोसाठी केबल, ओएफसी केबल टाकण्याचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशनकडून देण्यात आली. भुयारी मेट्रो मार्गातील रूळ, विद्युत तारा आणि सिग्लन यंत्रणांची कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर भुयारी मार्गात मेट्रोची चाचणी घेतली जाईल, असे महामेट्रोचे वव्यवस्थापकीय संचालक डॅा. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speeding up pune metro subway track laying works the actual test will be held soon pune print news tmb 01
First published on: 28-08-2022 at 16:58 IST