काचेला चिकटपट्टी लावून विमान सोडू का; ‘स्पाईस जेट’च्या अधिकाऱ्याचा पुणेरी सवाल

४० उद्योजकांसह अनेक प्रवासी सध्या विमानतळावर अडकून पडले

Spicejet plane , plane delayed, plane glass break , Pune, passangers, Pune airport, Loksatta, Loksatta news, Maratahi, Marathi news
Spicejet plane : स्पाईस जेटचे SG999 हे विमान पुण्याहून दिल्लीला जात होते. आज सकाळी ७.२० वाजता हे विमान उड्डाण करणार होते. मात्र, या बिघाडामुळे विमानाच्या उड्डाणाची वेळ दुपारी ३.०० वाजताची करण्यात आली आहे.

विमानाची काच फुटल्यामुळे आज पुणे विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचा खोळंबा झाल्याचा प्रकार घडला. स्पाईस जेटचे SG999 हे विमान पुण्याहून दिल्लीला जात होते. आज सकाळी ७.२० वाजता हे विमान उड्डाण करणार होते. मात्र, या बिघाडामुळे विमानाच्या उड्डाणाची वेळ दुपारी ३.०० वाजताची करण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळाचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. पुण्यातील तब्बल ४० उद्योजकांसह अनेक प्रवासी सध्या विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांकडून स्पाईस जेटच्या प्रशासनाकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये स्पाईस जेटच्या एका अधिकाऱ्याने काचेला चिकटपट्टी लावून विमान सोडू का, असा  युक्तिवाद केल्याने या वादात आणखीनच भर पडली. काही वेळापूर्वीच स्पाइस जेट विमानाला हवे असलेले सुटे भाग पुण्याला पोहोचले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून ४ पर्यंत विमानाच्या उड्डाणाची शक्यता आहे. दरम्यान, या विमानातील काही प्रवासी स्पाइस जेटच्या अन्य विमानांनी रवाना झाले आहेत.

whatsapp-image-2017-02-22-at-13-14-00

whatsapp-image-2017-02-22-at-13-13-49

whatsapp-image-2017-02-22-at-13-11-21

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Spicejet plane delayed to plane glass break in pune

ताज्या बातम्या