रौप्य पदक विजेता उदरनिर्वाहासाठी विकतोय आयुर्वेदिक औषधे | Loksatta

रौप्य पदक विजेता उदरनिर्वाहासाठी विकतोय आयुर्वेदिक औषधे

आंतरराष्ट्रीय खेळाडू परिस्थितीशी झगडतोय.

रौप्य पदक विजेता उदरनिर्वाहासाठी विकतोय आयुर्वेदिक औषधे
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक विजेता पराग पाटील

न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये तिहेरी उडी प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंवर आर्थिक परिस्थितिने घाला घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या खेळाडूवर आयुर्वेदिक औषधे विकण्याची वेळ आली आहे. पराग पाटील अस या खेळाडूचे नाव आहे. आजपर्यंत परागने तब्बल ११ पदक मिळवली आहेत. त्यातील भारतामध्ये तीन पदक मिळवली आहेत. तर आठ पदक ही परदेशात मिळवली आहेत.

पिंपरी चिंचवडमधील परागने एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या न्यूझीलंडच्या वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये झाला होता. त्या ठिकाणी तिहेरी उडी या प्रकारात सहभाग नोंदवत भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून परागची आर्थिक परिस्थिती बेताची सुरू आहे. पराग ओपन जिममधील मशीन बनवतो. त्यामध्ये त्याला चांगले उत्पन्न देखील मिळायचे. नोव्हेंबर महिन्यापासून त्याला ५० ते ६० हजाराच्या दोन ऑर्डर मिळाल्या होत्या. त्यानंतर ऑर्डर न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. विशेष म्हणजे याच पैशातून पराग न्यूझीलंड येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर गेम्स मध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी जवळपास दोनलाखापर्यंत खर्च आला होता.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पराग पाटील आणि त्यांची पत्नी सुनीता पाटील हे दोघे आकुर्डी येथील म्हळसाकांत चौकात, रात्रीच्या वेळी स्टॉल मांडून आयुर्वेदिक औषधे आणि उत्पादने विकत आहेत. त्यामधून त्यांना दोन तासात १०० ते १५० रुपये एवढी रक्कम मिळते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतो. पराग दिवसा त्यांच्या ओपन जिम मशीनची मार्केटिंग करतो. सद्या घरात तो एकटाच कमावता आहे. घर देखील भाड्याने असल्याने त्यासाठी महिन्याला सात हजार रुपये द्यावे लागतात. तसेच न्यूझीलंड येथे झालेल्या 1र्धे दरम्यान त्यांच्या घुडघ्याला जखम झाली होती.  सरकार एकीकडे खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. लाखो करोडो रुपये हे क्रिकेट जगतात उधळले जाता आहेत. तर दुसरीकडे भारताचे प्रतिनिधीत्व करताना तब्बल ११ पदके मिळवणारा पराग पाटील या आंतरराष्ट्रीय खेळाडूला परिस्थितीशी दोन हात करावे लागत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-05-2017 at 11:44 IST
Next Story
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन