जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटने टोल नाका हटवण्यासाठी आजपासून सोमाटने टोल नाका हटाव कृती समितीने बेमुदत उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असून सत्तेतील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील या कृतीसमितीला पाठिंबा दिला आहे. बेमुदत उपोषणास बसलेल्या कृती समितीच्या सदस्यांना भेटण्यास आयआरबी चे अधिकारी आले होते. अशी माहिती कृती समितीचे किशोर आवारे यांनी दिली. जोपर्यंत सोमाटने टोल नाका हटवण्यात येणार नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटने टोल नाक्याच्या प्रश्नावरून राज्यसरकार ची डोकेदुखी वाढू शकते. सत्तेत च असणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळकरांना पाठिंबा दर्शवत हा अन्यायकारक टोल हटला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती टोल नाका हटवण्याची मागणी करत आहे. संबंधित टोलनाका हा बेकायदेशीर आहे. असा आरोप किशोर आवारे यांनी केला आहे. आज बेमुदत उपोषण सुरू केले असून आयआरबी चे अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली. टोल नाका बेकायदा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, त्यांनी कोणाची परवानगी घेऊन हा टोलनाका सोमाटने येथे बांधला? , १९ किलोमीटर च्या आत टोल नाका आहे हा देखील वाद आहे असं असताना हा टोलनाका बेकायदा आहे असा आरोप आवारे यांनी केला आहे. जोपर्यंत टोल नाका हटणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण मागे घेणार नाहीत असा पवित्रा सोमाटने टोल नाका हटाव कृतीसमितीने घेतला आहे. तळेगावातील विठ्ठल मंदिरात हे बेमुदत उपोषण सुरू आहे.