पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांवर भीक मागो आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ‘८० एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक अवाक्षर काढायला तयार नाहीत. आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे, त्यामुळंच आज सिग्नलवर भीक मागून आलेल्या पैशांमधून ढोल विकत घेणार आहोत. तो वाजवून त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असं एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं.  

यावेळी काही एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. 

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत. असा आरोप करत आज नाशिक फाटा येथील सिग्नलवर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. भिकेतून मिळालेल्या पैशांमधून एक ढोल विकत घेतला जाणार असून त्याद्वारे आमचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याच एसटी कर्मचारी सांगतात.

PHOTOS: ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत तुम्हीच मदत करा; ST कर्मचाऱ्यांचं पुण्यात ‘भीक मागो’ आंदोलन

ते पुढे म्हणाले की, ‘८० एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते सर्व आर्थिक संकटात सापडले होते. आमची ही परिस्थिती सरकारकडे मांडली. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याबद्दल अवाक्षर काढले नाही. ते ऐकण्यासाठी तयार आहेत की नाहीत हा प्रश्न आहे. त्यांनी आमचं गाऱ्हाणं ऐकून घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. ही आमची प्रमुख मागणी आहे. आमचं म्हणणं त्यांना येकू जात नसल्याने सिग्नलवर भीक मागून त्या पैशांमधून ढोल विकत घेऊन तो वाजवून त्यांच्यापर्यंत आवाज पोहचवणार आहोत. आमच्यावर अन्याय होतोय, हे प्रशासनाला माहीत आहे. मात्र ते आमचं एकूण घेत नाहीत. हे आमचं मोठं दुर्दैव आहे,’ अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.