scorecardresearch

पुणे : एसटी प्रवासी तरुणीचे दीड लाखांचे दागिने लंपास

रुणीच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट भागात घडली.

पुणे : एसटी प्रवासी तरुणीचे दीड लाखांचे दागिने लंपास
( संग्रहित छायचित्र )

एसटी प्रवासी तरुणीच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याबाबत एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी स्वारगेट एसटी स्थानकातून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जात होती. स्वारगेट एसटी स्थानकात तिने ठाणे-अक्कलकोट या मार्गावरील बसमध्ये प्रवेश केला. बसमध्ये गर्दी होती.

चोरट्याने पिशवीतून दीड लाखांचे दागिने लांबविले. हडपसर परिसरात एसटी प्रवासी तरुणीच्या पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आला. तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या