पुण्यात एस.टी कामगारांचं अर्धनग्न आंदोलन

“राज्यकर्त्यांमुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आली”, कामगारांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यातील एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कामगार अर्धनग्न आंदोलनास बसले आहेत. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यकर्त्यांमुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आली, कामगारांची संतप्त प्रतिक्रिया

ज्या राज्यकर्त्यांनी सत्ता भोगली किंवा विरोधी बाकावर राहिले, त्यांनी आजवर तुमचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन मागे घेतले, कारण आमचे प्रश्न मार्गी लागतील,अशी आशा होती. मात्र आता आम्ही मागे हटणार नसून राज्य सरकारने लवकरात लवकर एस.टी कामगार शासनामध्ये विलिनीकरणाचा आदेश काढावा, अन्यथा अधिक तीव्र लढा उभारला जाईल. तुमच्यामुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे,आजवर आम्ही कोणताही सण कुटुंबा सोबत साजरा केला नाही.एवढ तरी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – मुंबईत हालचाली वाढल्या, शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; तर्क-वितर्कांना उधाण!

एस.टी कामगारांचा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावावा, प्रवाशांची मागणी

राज्यात दोन दिवसापासून एस.टी आगारात असल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खासगी ट्रॅव्हल्सवाले नेहमीचे दर २०० रुपये असतील तर आज हेच दर ७०० ते ८०० रुपये प्रत्येक प्रवाशाकडून घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना असून एका बाजूला महागाईमुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. त्या मध्ये आता एस.टी कामगारांच्या संपामुळे आम्हाला किमान तीन पट दर देऊन प्रवास करावे लागत आहे. यामुळे राज्य सरकारने एस.टी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा आणि आमची जादा तिकीट दारातून सुटका करावी, अशी मागणी प्रवाशांनी यावेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St workers protest in pune for their demands vsk 98 svk

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या