scorecardresearch

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी (११ मे) दुपारी साडेबाराच्या सुमारास फुरसुंगीतील तरवडे वस्तीवर घडली.

याप्रकरणी सोमनाथ कामठे (वय ४२, रा. तरवडे वस्ती ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हे घरी असताना आरोपी त्यांच्याकडे गेला. तू मला दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी त्याने केली. मात्र, सोमनाथने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने त्यांना शिवीगाळ करून कोयत्याने कपाळावर वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stabbed not paying alcohol crime report police station accused sub inspector police amy

ताज्या बातम्या