गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आले. या अंतर्गत राज्यातील १०८ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, पुरस्कार प्रदान कार्यक्रम ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मुंबईत होणार आहे.

हेही वाचा- पुणे : पिंपरी पालिकेचे सुधारित वैद्यकीय परवाना धोरण; सुश्रृषागृहांना १ ते ५ खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
PM Modi receives the Order of the Druk Gyalpo by Bhutan King Jigme Khesar
पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित; पहिल्यांदाच घेतला ‘हा’ वेगळा निर्णय!

पुरस्काराच्या निवडीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. राज्य शिक्षक पुरस्कार १९६२-६३ पासून देण्यात येतात. यंदा या पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला. तसेच पुरस्काराचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार करण्यात आले. पुरस्कारांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले होते. राज्य निवड समितीने ५ सप्टेंबर रोजी निवड यादी शासनाला सादर केली होती. मात्र पुरस्कारांचीच घोषणा गेल्या दोन महिन्यांपासून रखडली होती.

हेही वाचा- पुणे महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी कारवाई; १ हजार किलो प्लास्टिक जप्त

जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये एकूण १०८ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्राथमिकचे ३८ शिक्षक, माध्यमिकचे ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात काम करणारे प्राथमिकचे १८ शिक्षक आहेत. तसेच कला-क्रीडाच्या दोन शिक्षकांना आणि स्काऊट गाईडच्या दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला. एक पुरस्कार अपंग शिक्षक किंवा अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकांना घोषित करण्यात आला. तर आठ शिक्षिकांना शिक्षकथोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.