पिंपरी- चिंचवड:राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरीतील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन केले. यावेळी सभेला संबोधित करत असताना खासगीत अनेक जण पक्षात येण्या संदर्भात बोलतात, पण जाहीरपणे बोलून त्यांना मी अडचणीत आणणार नाही. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटात अनेक जण येण्यास इच्छुक असल्याचा स्पष्ट केले आहे.पिंपरीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनतर झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टीका करत चांगलीच फटकेबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले, राज्यामध्ये बदलाचं राजकारण होत आहे. परंतु, हे फार काळ टिकत नाही. आजही अनेक जण शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. ते मला खासगी बोलतात मी जाहीरपणे बोलून त्यांना अडचणीत आणणार नाही. राज्यातील हे वातावरण कोणामुळे होत आहे? पक्ष फोडण्याचा काम कोण करत आहे? हे चातुर्य कोणाच आहे?, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळल आहे. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल अशी टीका जयंत पाटील यांनी विरोधकांवर केली. पुढे ते म्हणाले की, चार राज्यातील निकाल लागणार आहे तो काय लागेल हे माहीत नाही पण त्या ठिकाणची जनता प्रचंड त्रस्त होती हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळालं. पिंपरी- चिंचवड शहरांमधील अनधिकृत बांधकाम, रेड झोन अशी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केवळ सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिली. पण ते प्रश्न सोडवू शकले नाहीत. पिंपरी- चिंचवडकरांनी सत्ताधाऱ्यांना हा जाब विचारला पाहिजे. पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याबाबत बोलताना जयंत पाटलांनी विचारांशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. त्यांची पुण्याच्या शहराध्यक्षपदी अजित पवार यांनीच नियुक्ती केली होती. तरी देखील ते शरद पवार गटासोबत आहेत. ते एकनिष्ठ आणि विचारांशी बांधिलकी असलेला कार्यकर्ता असल्याचा उल्लेख त्यांनी केला..

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Story img Loader