scorecardresearch

पुणे : अघोरी कृत्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, सिंहगड रस्ता पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश

या प्रकरणी तातडीने कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी सिंहगड रस्ता पोलिसांना दिला.

पुणे : अघोरी कृत्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, सिंहगड रस्ता पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश
अघोरी कृत्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल (लोकसत्ता ग्राफिक्स)

मूल होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडाची पावडर खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकाराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी सिंहगड रस्ता पोलिसांना दिला.

याबाबत एका २८ वर्षीय विवाहितेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी पती जयेश कृष्णा पोकळे, तसेच श्रेयश कृष्णा पोकळे, इशा श्रेयस पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णू पोकळे (रा. राधाकृष्ण व्हिला, पोकळे पॅराडाइज, धायरी) दीपक जाधव आणि बबीता ऊर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा – पुणे : म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेला चांगला प्रतिसाद

तक्रारदार महिला आणि जयेशचा विवाह ठरल्यानंतर साखरपुडा पंचतारांकित हॉटेलात ठेवणे, ८० तोळे सोने द्यावे, साखरपुड्याला येणाऱ्या प्रत्येक महिलेला जोडवे द्यावेत आदी मागण्या पोकळे कुटुंबीयांनी केल्या होत्या. मागणीला होकार दिल्याने साखरपुडा झाला. त्यानंतर मोटारीची मागणी झाली. त्यानुसार पाच लाखांची गाडीही देण्यात आली. विवाह थाटामाटात झाला, मात्र त्यानंतर विवाहितेचा छळ सुरू झाला.

हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी

अमावस्येला घरातील मंडळी एकत्र येऊन आणि काळे वस्त्र घालून तळघरात रहस्यमय खोलीत काहीतरी करीत असल्याचे तिला एकदा दिसले. मोबाइलवर एक महिला सांगेल त्या प्रमाणे घरातील व्यक्ती पूजा करीत होत्या. व्यवसायात भरभराट व्हावी आणि मूल होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला अशीच पूजा होऊ लागली. त्यात विवाहितेलाही सहभागी करून घेतले जात होते. एका अमावस्येला पतीसह सर्व मंडळींनी तिला घराजवळील स्मशानभूमीत नेले. जळालेल्या प्रेताची हाडे त्यांनी जमा केली. राखही बरोबर घेतली. या वस्तू घरी आणून त्यांनी पूजा केली आणि ती राख पाण्यात टाकून बळजबरीने तिला पिण्यासाठी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 22:35 IST

संबंधित बातम्या