Premium

बारामतीमधून कोण निवडणूक लढविणार? सुनील तटकरे म्हणाले, ‘हा निर्णय…’

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. मात्र पक्ष म्हणून आम्ही वास्तववादी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे दिली.

sunil tatkare
बारामतीमधून कोण निवडणूक लढविणार? सुनील तटकरे म्हणाले, 'हा निर्णय…'

पुणे : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. मात्र पक्ष म्हणून आम्ही वास्तववादी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढविणार, याचा निर्णय अजित पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना किंवा पत्नी सुनेत्रा यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिल्यानंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे यांनी बारामतीचा निर्णय अजित पवार घेतील, हे स्पष्ट केले. गणपतीकडे पक्षाकडे काही मागण्याची आवश्यकता नाही. राज्याला गतीमान करावा, अशी मागणी केल्याचे तटकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“शरद पवार कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही”, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

ते म्हणाले की, येत्या सहा ऑक्टोबर रोजी पक्षाबरोबर किती आमदार आणि किती खासदार आहेत, हे निश्चित होईल. त्यानंतर आगामी निवडणुकीत किती जागा लढायच्या याचा निर्णय चर्चा करून घेतला जाईल. बारामतीच्या उमेदवाराबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याचा निर्णय अजित पवार घेतली. यापुढे शरद पवार काही बोलले तरी आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statement of sunil tatkare on baramati election pune print news apk 13 amy

First published on: 24-09-2023 at 20:19 IST
Next Story
पावसाला सुरुवात; पालेभाज्या झाल्या स्वस्त