पाणी उकळून पिण्याचे डॉक्टरांचे आवाहन

पुणे : पावसाळ्यात दूषित पाणी किं वा दूषित पाण्यापासून बनवलेल्या अन्नपदार्थाच्या सेवनातून पोटाच्या विकारांचे रुग्ण दिसतात. नुकताच धरण परिसरात झालेल्या प्रचंड पावसामुळे खडकवासला धरणातून पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यानंतर उलटय़ा, जुलाब आणि पोटाच्या विकारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात गढूळ पाण्यातील दूषित अंश पोटात गेल्याने उलटय़ा, जुलाबांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात होते. मागील काही दिवसांमध्ये शहरालगतच्या धरण परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. त्यानंतर धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पिण्याचे पाणी शुद्ध करून पुरवले जात असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी उकळून थंड के लेले पाणी पिण्याचे आवाहन महापालिके च्या यंत्रणेकडून करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी बाह्य़रुग्ण विभागात येणाऱ्या उलटय़ा, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, मागील काही दिवसांत पाण्यामुळे पोटाचे विकार उद्भवलेले रुग्ण येत आहेत. उलटय़ा, जुलाब अशी लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत. दोन ते तीन दिवसांमध्ये हे रुग्ण बरे होत आहेत. अशा रुग्णांना औषधोपचारांपेक्षा विश्रांतीची अधिक गरज असते. शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊ नये यासाठी उकळून थंड के लेले पाणी, ओआरएस पावडरचे पाणी पित राहणे आवश्यक आहे. घरी तयार के लेले साधे, गरम जेवण आणि विश्रांतीने रुग्ण बरे होतात. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात नियमित पिण्याचे पाणी उकळून थंड के लेले असावे. बाहेरील उघडय़ावरचे पदार्थ खाऊ नये. दोन ते तीन दिवसांत बरे न वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.