scorecardresearch

पुणे : शेगाव, जलंब स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा

शेगाव आणि जलंब स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

ticketless travellers in pune
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

पुणे : शेगाव आणि जलंब स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा थांबा देण्यात आला आहे.पुणे-नागपूर-पुणे या साप्ताहिक गाडीला पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. पुण्याहून ३० मार्चला सुटणारी पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी शेगाव स्थानकावर सकाळी ७.४० वाजता पोहोचेल आणि ७.४१ वाजता पुढे मार्गस्थ होईल.

नागपूरवरून ३१ मार्चला सुटणारी नागपूर-पुणे एक्स्प्रेस शेगाव स्थानकांवर रात्री ७.४० वाजता पोहोचेल आणि ७.४१ वाजता पुढे मार्गस्थ होईल. कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर या गाडीला जलंब स्थानकावर पुढील सहा महिन्यांसाठी थांबा देण्यात आला आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी सकाळी ९.०९ वाजता जलंब स्थानकावर पोहोचेल आणि ९.१० वाजता पुढे मार्गस्थ होईल. गोंदियाहून सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस जलंब स्थानकावर दुपारी ३.५९ वाजता पोहोचेल आणि ४ वाजता पुढे मार्गस्थ होईल, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:56 IST

संबंधित बातम्या