पुणे : सोसायट्यांमधील पाणीगळती थांबवा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना|stop water leakage in societies guardian minister chandrakant patil suggestion | Loksatta

पुणे: सोसायट्यांमधील पाणीगळती थांबवा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

पुणे: सोसायट्यांमधील पाणीगळती थांबवा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पाणीगळती थांबवण्यासाठी जुन्या पाइपलाइन बदलण्यात याव्यात. कामांसाठी आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या वाढवून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. सोसायट्यांमधील पाणीगळतीची कामे तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आढावा घेतला. महापािलकेला मंजूर पाण्याचा कोटा, मागील वर्षातील पाण्याच्या स्रोत निहाय दैनंदिन पाण्याचा वापर, पाण्याचे अंदाजपत्रक, जल शुद्धीकरण केंद्र, समान पाणीपुरवठा प्रकल्प, टाक्या, जलवाहिन्यांच्या कामाची प्रगती आणि नियोजन, जलमापक बसविण्याच्या कामाची प्रगती आणि नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. समान पाणीपुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट आदेशाही त्यांनी दिले. पाणीयोजनेच्या कामांचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

हेही वाचा: गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करा; पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन

पाटील म्हणाले, की पाण्याच्या टाक्यांची कामे महापालिकेने निर्धारित कालमर्यादेतच सप्टेंबर २०२३ पर्यंत तर जलवाहिनीचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे. समान पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पाण्याची साठवणक्षमता वाढवून ३३ टक्क्यांपर्यंत होऊन सर्वांना समान पाणी मिळणार आहे. पाणीगळती थांबवण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात याव्यात. सोसायट्यांमधील पाणीगळतीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत.

हेही वाचा: डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली

सिंहगड रस्ता उड्डाणपुलाचा आढावा
सिंहगड रोडवर होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचाही आढावा चंद्रकांत पाटील यांनी घेतला. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागरिकांसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करावेत आणि अतिक्रमणे काढावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:31 IST
Next Story
गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करा; पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन