scorecardresearch

सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाला बेदम मारहाण – श्वानाच्या मृत्यू प्रकरणी रखवालदारावर गुन्हा

पुण्यातील वाघोली भागातील घटना; प्राण्यांना क्रुरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करणात आला आहे

crime
(सांकेतिक फोटो)

सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाला रखवालदाराने दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वाघोली भागात घडली. या प्रकरणी रखवालदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रखवालदार तानाजी तांबे याच्या विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करणात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोली परिसरातील मिकासा सोसायटीत राहायला आहे. या सोसायटीत तांबे रखवालदार आहे. त्याने सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानाला दांडक्याने बेदम मारहाण केली.

मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशी महिलेने पोलिसांना या घटनेची माहिती देऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stray dog beaten to death in societys yard crime against guard in dog death case pune print news msr

ताज्या बातम्या