स्वर्गातून इंद्रदेव आणि शिपाई भूतलावरील एका नगरीत येतात. येथील खड्डेमुक्त रस्ते, वाहतुकीची समस्या सोडविणारे उड्डाण पूल आणि विकसित केलेली विविध उद्याने पाहून ‘आपण कुठे आलो’, असे इंद्रदेव विचारतात. ‘महाराज, आपण ‘स्मार्ट सिटी’ म्हणजेच पुण्यनगरीत आलो आहोत’, असे शिपाई इंद्रदेवांना सांगतात.. लोकनाटय़ाच्या अंगाने जाणाऱ्या राजकीय पथनाटय़ातून उमेदवारांच्या प्रचारात रंग भरण्यासाठी हौशी युवा रंगकर्मी सज्ज झाले आहेत. शाहीर दादा पासलकर आणि विविध मालिकांचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी पथनाटय़ निर्मितीमधून अंग काढून घेतल्याने विविध पक्षांना हौशी कलाकारांकडे आपला मोर्चा वळवावा लागला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित ११-१२ दिवसांत अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांची लबगग सुरू झाली आहे. केवळ प्रचार साहित्याद्वारे मतदारांवर छाप पाडण्यापेक्षाही वेगेवेगळ्या माध्यमांतून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकनाटय़ाचा बाज असलेल्या पथनाटय़ाद्वारे मतदारांना आकृष्ट करण्याचा पारंपरिक मार्ग काही उमेदवारांनी स्वीकारला आहे. त्यामुळे हौशी कलाकार, राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) युवक-युवतींचे गट पथनाटय़ सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत.

33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल
Vanchit Bahujan Aghadi
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग
eknath shinde
ठाणे, नाशिक, यवतमाळचा तिढा कायम; शिंदे गटाची पहिली यादी जाहीर
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

[jwplayer TopWeolJ]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आमचा ग्रुप पथनाटय़ सादर करणार आहे. आठ कलाकारांचा सहभाग असलेले दोन संघ त्यासाठी तयार झाले आहेत. या संघामध्ये ढोलकीवादक आणि युवक-युवतींचा समावेश आहे. मतदारांना खिळवून ठेवणारी २० मिनिटांची संहिता, कलाकारांच्या अभिनयाला  ढोलकीच्या थापाची साथ, ग्रामीण बोली आणि प्रसंगी विनोदाचा केलेला वापर ही या पथनाटय़ाची वैशिष्टय़े आहेत. आता उर्वरित दिवसांत संपूर्ण शहरभरातील विविध प्रभागांमध्ये सकाळच्या सत्रात चार आणि सायंकाळच्या सत्रात चार असे किमान या पथनाटय़ांचे प्रत्येकी आठ प्रयोग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती या पथनाटय़ पथकाचे निर्मिती सूत्रधार नाना मोहिते यांनी सांगितले. राष्ट्रवादीने केलेला शहराचा विकास आणि स्मार्ट सिटी घडविण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन या पथनाटय़ाच्या माध्यमातून मतदारांना करण्यात आले आहे. शाहीर दादा पासलकर यांची ‘मंगल थिएटर्स’ ही संस्था आणि चित्रपट लेखक प्रवीण तरडे यांनी यंदाच्या निवडणुकीसाठी पथनाटय़ निर्मितीमधून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे हौशी कलाकारांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराकरिता पथनाटय़ाची निर्मिती केली होती. पाचशे कलाकारांनी राज्यभरातील उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र, महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चामध्ये पथनाटय़ कलाकार हे अखेरचे असतात. त्यामुळे माझ्यासाठी काम करणाऱ्या कलाकारांना पैशांची हमी मिळणार नाही अशी अडचण जाणवते, असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

पथनाटय़ परवानगीमध्ये अडकले

निवडणूक प्रचार करण्यासाठी पथनाटय़ सादर करावयाचे असेल तर त्यासाठी विविध कार्यालयांकडून परवानगी घ्यावी लागते. महापालिका क्षेत्रीय कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि पथनाटय़ रस्त्यावर सादर होत असल्याने वाहतूक पोलीस शाखेचीही परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी मिळाल्यानंतरच पथनाटय़ सादर करता येते, असे नाना मोहिते यांनी सांगितले.

[jwplayer vr1NXjZ8]