scorecardresearch

पुण्यात कडकडीत बंद; दुपारनंतर व्यवहार सुरळीत

दुपारी तीननंतर व्यापारी पेठेतील दुकाने उघडली. हाॅटेल उघडण्यात आली. खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या सुरू झाल्या. पीएमपी सेवा तसेच रिक्षा सुरू झाल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले.

पुण्यात कडकडीत बंद; दुपारनंतर व्यवहार सुरळीत
पुण्यात कडकडीत बंद; दुपारनंतर व्यवहार सुरळीत

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष, संघटनांनी मंगळवारी बंद पुकारला. बंदमुळे शहरात सकाळपासून शुकशुकाट असल्याचे पाहायल मिळाला. दुपारी तीननंतर शहरातील व्यवहार पूर्ववत झाले. हाॅटेल्स आणि दुकाने उघडण्यात आली.

बंदमुळे शहरातील व्यवहारावर परिणाम झाला. सकाळपासून शहरात शुकशुकाट होता. बंदमुळे शहर तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी पीएमपी बस सेवा तसेच रिक्षाही बंद होत्या. शहरातील हाॅटेल, दुकाने बंद होती. सकाळी अकरानंतर डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली.. लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकात दुुपारी दीडच्या सुमारास पोहोचला. माेर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडला. बंदला शहरातील व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.

हेही वाचा… अखेर शाईफेक प्रकरणातील तिघांवरील ३०७ कलम हटवले

त्यामुळे लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शनिपार, मंडईसह व्यापारी पेठेतील दुकाने सकाळी बंद होती. दुपारी तीननंतर व्यापारी पेठेतील दुकाने उघडली. हाॅटेल उघडण्यात आली. खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या सुरू झाल्या. पीएमपी सेवा तसेच रिक्षा सुरू झाल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले. बंदच्या कालावधीत शहरात अनुचित प्रकार घडला. माेर्चाचा मार्ग तसेच शहरातील संवेदनशील भागात १०० पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा… पुणे : आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड; ‘वाट बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या अध्यक्षासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा

विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय

सकाळी पीएमपी बस आणि रिक्षा बंद असल्याने विद्यार्थी आणि नोकरदारांची गैरसोय झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद असल्याने पालकांची धावपळ उडाली. दुपारनंतर शहरातील बहुतांश मार्गावरील पीएमपी सेवा सुरू झाली तसेच रिक्षा सुरू झाल्याने नोकरदार महिलांना दिलासा मिळाला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 21:45 IST

संबंधित बातम्या