पुणे : स. प. महाविद्यालयातील गणित विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक मनोहर रा. राईलकर (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राईलकर पुण्याच्या भावे प्रशालेचे विद्यार्थी होते. १९४५मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी गणित आणि संख्याशास्त्र या दोन विषयांत विज्ञान शाखेतून पदव्यूत्तर पदवी संपादन केली.

त्यांनी स. प. महाविद्यालयात ३४ वर्षे गणिताचे अध्यापन केले. त्यापैकी २८ वर्षे ते गणित विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेचे प्रमुख आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी लिहिलेले ‘ग्यानबाचं कॅल्क्युलस’ हे पुस्तक गाजले होते. तसेच, त्यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी थोर ब्रिटिश तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्या ‘गणिती तत्वज्ञाना’वरील पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला होता. ते मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे ज्येष्ठ आजीव सभासद होते. राईलकर ‘लोकसत्ता’साठी नियमित लेखन करत असत.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?