पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. त्यावेळी त्यांनी स्वतः ई तिकीट काढून मेट्रोत प्रवास देखील केला. यावेळी पुण्यातील सौ. विमला बाई गरवारे शाळा आणि महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. या प्रवासाबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता, आम्ही आजचा क्षण कधीच विसरू नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “काही सन्माननीय पदावरील व्यक्ती…”!

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेच्या दुसर्‍या वर्षांत शिक्षण घेणारा गौरव मालक हा तरुण देखील होता. या तरुणाला विचारलं असता तो म्हणला की, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रवास अभूतपूर्व होता. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांनी आम्हाला तुमची स्वप्नं काय आहेत, हे देखील विचारले. माझ्यासह इतरांनी देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या. सर तुम्ही छान मराठी बोलता यावर कधी कधी प्रयत्न करतो, असे मोदी म्हणाले. त्यानंतर आम्हा सर्वांना त्यांनी शाबासकी देखील दिली,” असं गौरवने सांगितलं.

“रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास?”

“आम्ही नेहमी टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहत आलो. पण आज त्यांच्या सोबत प्रत्यक्ष भेटता आले. त्यांच्या सोबत असलेल्या ताफ्याचे आजवर व्हिडीओ पाहत आलो, पण आज प्रत्यक्ष भेटून खूप छान वाटलं,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या प्रवासामुळे मुले खुप आनंदी होती.