दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : राज्यातील साखर कारखानादारांची सुमारे दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून वाहतूकदार आणि मुकादमांशी केलेल्या करारात ही फसवणूक झाली आहे. पण या वादात सामान्य ऊसतोड मजूर वेठीस धरले जात आहेत.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
coal production
कोळसा उत्पादनानं पार केला १ अब्ज टनचा टप्पा; आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते. पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे. कारखाने ऊसतोडणीसाठी थेट ऊसतोडणी मजुरांशी करार करीत नाहीत. मुकादम आणि वाहतूकदारांशी करार करतात. वर्षांनुवर्षे असेच चालत आले आहे. पण अलिकडे बोगस मुकादम आणि वाहतूकदारांचे पेव फुटले आहे. उसाच्या तुटवडय़ामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

ऊसतोडणी मजूर वेठीस

करार मुकादम आणि वाहतूकदारांशी केला असला तरीही सामान्य ऊसतोडणी मजूर वेठीस धरले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूकदाराने फसवणूक केली तर मुकादम आणि मजूर कायद्याच्या कचाटय़ात अडकतात. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांतील अधिवासी ऊसतोडणी मजुरांवर कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकात गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यांची वाहने कारखान्यांनी बेकायदा अडवून धरली आहेत.

सामान्य ऊसतोडणी मजूर प्रामाणिकपणे काम करतो. पण, मुकादम आणि वाहतूकदारांकडून आमची फसवणूक होत आहे. यंदा हंगाम सरासरी १२० दिवस चालला, हंगाम १५० दिवस चालला असता तर कदाचित इतका गंभीर प्रश्न निर्माण झाला नसता. पुढील वर्षांपासून कायद्याच्या कसोटीवर टिकतील, जबाबदारी निश्चित होईल, असे करार करण्यात येतील.  – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ

कारखानदारांच्या चुकीचा सामान्य ऊसतोडणी मजुरांना फटका बसतो. विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांकडून कारखानदारांच्या हिताचे संरक्षण केले जाते. मजुरांना मारहाण होणे, डांबून ठेवणे, वाहने जबरदस्तीने अडविणे, असे प्रकार घडत आहेत. या विरोधात १२ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सत्यागृह आंदोलन करणार आहे.  – राजन क्षीरसागर, सरचिटणीस, लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियन (आयटक)