पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्व प्राथमिक ते तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला २०२६ पर्यंत मूलभूत स्तरावर वाचन, लेखन आणि अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने निपुण भारत अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाच्या राज्य ते जिल्हा स्तरावर अंमलबजावणीच्या विविध मार्गदर्शक सूचना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दिले आहेत.

मार्गदर्शक सुचनांनुसार करोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा होणारा अध्ययन ऱ्हास जाणून घेण्यासाठी पायाभूत साक्षरता, मूलभूत संख्याज्ञानविषयक अध्ययन स्तर निश्चिती करावी, विद्यार्थी स्तर निश्चितीनुसार उपचारात्मक अध्यापनासाठी शिक्षक उद्बोधन आणि पालक सहभागासाठी मार्गदर्शन करावे, अभियानाअंतर्गत गट साधन केंद्र, समूह साधन केंद्रांची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करावी, जिल्हा-तालुका स्तरावर अधिकारी, शिक्षक पालक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या सहभागातून पायाभूत साक्षरता, संख्याज्ञानासाठी समर्पित अशा स्रोत गटाची स्थापना करावी, असे कळवण्यात आले आहे. हे सदस्य निपुण मित्र म्हणून जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्षास सहाय्य करतील. जिल्हा-तालुका स्तरावर क्षेत्रीय अधिकारी शिक्षक, पालकांमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..