सदैव हसतमुख आणि मिश्कील स्वभावाचे… प्रचंड चैतन्य आणि कामाविषयीची तळमळ… पर्यावरण विषयामध्ये वाहतूक विषयाचा समावेश करण्याचे द्रष्टेपण… प्रत्येकाचे जीवन चांगले व्हावे हेच जीवनाचे साध्य मानून ठोस भूमिका घेणारे… मुद्रण व्यवसायामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे… अभिजात संगीताबरोबरच जाझ संगीताचा व्यासंग जोपासणारे… अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे सुजित पटवर्धन हे तर पर्यावरण चळवळीचा कणा होते, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी सुजित पटवर्धन यांच्या आठवणींना शुक्रवारी उजाळा दिला.

हेही वाचा >>>विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; एकास अटक

पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेमध्ये ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, खासदार वंदना चव्हाण, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, प्रयास ऊर्जा गटाचे शंतनू दीक्षित, अनिल मंद्रुपकर, हर्षद अभ्यंकर, राजेंद्र सिधये, मित्र थिंक टँकचे अनिल अभंग, सचिन पुणेकर, संजय शंके यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा >>>गुंड गजा मारणेला न्यायालयीन कोठडी

फिरोदिया आणि पटवर्धन ही दोन्ही कुटुंबे मूळची नगरची. या दोन्ही घरांमध्ये तीन पिढ्यांपासूनचे घनिष्ठ संबंध होते. वाहन निर्मिती उद्योगामध्ये मला पटवर्धन यांचे सहकार्य लाभत होते. पर्यावरणपूरक वाहन निर्मिती करण्यासाठी त्यांच्याशी नियमित चर्चा होत असे, असे अरुण फिरोदिया यांनी सांगितले.वंदना चव्हाण म्हणाल्या, नगरसेविका झाल्यावर पर्यावरणविषयक प्रश्नांच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंध आला. सर्व विषयांवर अभ्यास असलेल्या सुजित यांचे पुण्याच्या पर्यावरण रक्षणामध्ये मोलाचे योगदान आहे. निवडणुकीत उभे राहायचे नाही आणि पदाची अपेक्षा नसल्यामुळे त्यांच्या कामामध्ये असलेली विलक्षण तळमळ मला भूमिका घेण्यासाठी उपयोगी ठरली.

हेही वाचा >>>‘ठाकरे सरकारमुळेच टाटा-एअर बस प्रकल्प राज्याबाहेर’; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची टीका

संजय शंके म्हणाले, पर्यावरणपूरक व्यवसाय कसा करावा हे पटवर्धन यांनी पथारी व्यावसायिकांना शिकविले.वेलणकर म्हणाले, आपली मते आग्रहाने ठासून मांडणाऱ्या सुजित यांच्या निधनाने पर्यावरण चळवळीचा कणा गेला. विकास आणि पर्यावरण हातात हात घालून जाऊ शकतात हे सिद्ध करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.