पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी दिले. त्यात शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असे  स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील शाळा प्रत्यक्ष स्वरूपात ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. आता करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध केले.

होणार काय?

Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

सर्वसाधारणपणे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिलअखेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिलअखेपर्यंत शाळा शनिवारी पूर्णवेळ, रविवारी ऐच्छिक स्वरूपात सुरू ठेवता येईल. पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात घेऊन निकाल मेमध्ये जाहीर करावा असे नमूद करण्यात आले आहे.

परिपत्रकाला उशीर..

शिक्षण विभागाला परिपत्रक प्रसिद्ध करण्यास उशीर झाला आहे. हे परिपत्रक आधीच प्रसिद्ध करायला हवे होते. १ मार्चपासून शाळा सकाळी सुरू होतात हे शिक्षण विभागाला माहीत असूनही मार्च अखेरीस परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. बऱ्याच शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत, काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. पालकांचे सुटीत गावी जाण्यासाठीचे आरक्षणही करून झाले आहे. मे महिन्यातील कामाबाबत मार्गदर्शन नसल्याचे मत शिक्षकांकडून मांडण्यात आले.